Pune-Nashik Railway: सेमी हायस्पीड रेल्वे ४ वर्षांत धावणार

पाऊण तासात कापणार अंतर शेतीमाल वाहतुकीला फायदा
Pune-Nashik-Railway
Pune-Nashik-RailwaySakal

चाकण : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे येत्या चार वर्षात धावण्याची दाट शक्यता आहे. हा राज्य व केंद्र सरकारचा पथदर्शी प्रकल्प असल्याने तो मार्गी लागत आहे. त्यामुळे पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊण तासात कापता येणार आहे. त्यामुळे कंपन्यांचा उत्पादित माल, कच्चा माल, शेतकऱ्यांचा शेतीमाल वाहतूक सुलभरीत्या कमी वेळात होऊन विकासाला चालना मिळणार आहे.

पुणे-नाशिक  रेल्वेमार्ग २३५ किलोमीटर अंतराचा आहे. या मार्गावर साधारणपणे दोनशे किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार आहे. सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग दुहेरी होणार आहे. पुणे ते नाशिक हा प्रवास पावणेदोन तासात पूर्ण करता येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) च्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सहकार्याने राबविला जात आहे.

पुणे-नाशिक दरम्यान सध्या थेट रेल्वेमार्ग नाही. रस्ते मार्गाने प्रवासासाठी अगदी चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. पुणे-नाशिक मार्ग रेल्वेने जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. पुणे-नाशिक रेल्वेमुळे चाकण, पुणे, पिंपरी-चिंचवड, शिरूर, मावळ या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या उत्पादित व कंपनीचा कच्या मालाची ने-आण करण्यासाठी तसेच इतर व्यापारी माल, पुणे-नाशिक भागातील शेतीमाल आदींची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. त्यामुळे रोजगार, आर्थिक उलाढाल, महसुली उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.

पंचवीस हजार नागरिकांना नोकरीची संधी

या रेल्वेमार्गासाठी १०२ गावांची जमीन संपादित होणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि नाशिक तालुक्यातून ही रेल्वे जाणार आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे १०२ गावांतील जमीन संपादित होणार आहे. त्यासाठी मोजणीची कामे पूर्णत्वास येत आहेत. या रेल्वे मार्गामुळे पंचवीस हजार जणांना नोकऱ्या निर्माण होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. मागील वर्षी मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या प्राथमिक कामांनी वेग घेतला आहे. दरम्यान हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा अशी उद्योजक, व्यावसायिक, कामगार, प्रवासी, नागरिकांची मागणी आहे.

असा असेल प्रवास

पुणे स्थानकातून सुटणारी ही रेल्वे हडपसरला एलिव्हेडेटड डेकवरून जाणार आहे. त्यानंतर पुढे हडपसर ते नाशिक या मार्गावर जमिनीवरून जाईल. रेल्वेच्या रुळांशेजारील नागरिकांना पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी रुळांखालून प्रत्येक ७५० मीटर एक्झिट/ओपनिंग मार्ग तयार करण्यात येणार आहे. हाय-स्पीड प्रवासी रेल्वे, मालगाडी एकाच ब्रॉडगेज रुळावरून धावणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com