नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच

Published on

चाकण, ता. ७ : पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा ते चिंबळी फाटा या सुमारे दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे उद्योजक, व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी सारेच वैतागले आहेत. पण या कोंडीकडे राजकीय नेते, पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी यांना लक्ष देण्यास वेळच नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुणे-नाशिक महामार्गवर वाहतूक कोंडी सातत्याने होते. ही वाहतूक कोंडी विशिष्ट ठिकाणी होते. सर्वात जास्त त्रास कुरुळी फाटा, बर्गे वस्ती फाटा, मोई फाटा ,चिंबळी फाटा या ठिकाणी होत आहे. अगदी एक ते दीड किलोमीटरच्या अंतरासाठी साधारणपणे एक ते दोन तास जातात. या कोंडीतून राजकीय नेते अगदी मंत्री ये-जा करतात, पण ही वाहतूक कोंडी काही सुरळीत होत नाही, त्यामुळे नेमकी वाहतूक कोंडी कधी सुरळीत होणार हा प्रश्न अनेकांचा आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मार्गावर वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी येतात वाहतूक कोंडी कशीबशी सुरळीत होते, पण कोंडी आणि प्रवासी हैराण होणे हे नित्याचेच झाले आहे.

या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. या मार्गाचे काम प्रलंबित आहे. मार्ग अरुंद झालेला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस अहोरात्र काम करतात.
- नीलेश वाघमारे, पोलिस निरीक्षक, महाळुंगे वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com