

Navale Bridge Accident
Sakal
पुणे : नवले पुलावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुणे-सातारा महामार्गावर लक्ष केंद्रित केले आहे. खेड शिवापूर टोलनाकाजवळ दोन भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. शनिवारपासून (ता. २२) जडवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची शारीरिक तपासणी केली जाणार आहे. यात प्रामुख्याने डोळे आणि मद्यप्राशन केले आहे का, हे तपासले जाणार आहे. यांसह वाहनांचीदेखील तपासणी होणार आहे.