

Horrific Accident on Navale Bridge
Sakal
पुणे/धायरी : पुणे-बंगळूर महामार्गावर नवले पुलावर गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. ब्रेक निकामी झालेल्या भरधाव कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने समोरून जाणाऱ्या १७ वाहनांना एकापाठोपाठ धडक दिली. आग लागलेल्या या धावत्या कंटेनरने समोरील मोटारीला धडक दिली. त्यामुळे मोटारीलाही आग लागून सात जणांचा जागीच होरपळून, तर मालवाहू टेम्पोमधील अन्य एकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांसह एका लहान मुलीचा समावेश आहे. या अपघातात २० हून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत.