

AI Image for
Pune robbery case
esakal
Fake journalist arrested and two police constables booked for cash: पुण्यातील नवले पूल भागात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. या दरोड्याच्या गुन्ह्यात नऱ्हे पोलिसांनी एका तोतया पत्रकाराला बेड्या ठोकल्या आहेत, तर खेड शिवापूर पोलीस चौकीतील एका महिला पोलीस हवालदारासह पोलीस शिपायाला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. सध्या हे दोघेही फरार असल्याची माहिती आहे. याबाबत फिर्यादी हर्षवर्धन पवार यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.