esakal | Pune : राष्ट्रवादी कॉंग्रेसची जंबो शहर कार्यकारिणी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : राष्ट्रवादी कॉंग्रेसची जंबो शहर कार्यकारिणी जाहीर

sakal_logo
By
मंगेश कोळपकर : सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने २४० जणांची जंबो शहर कार्यकारिणी गुरुवारी जाहीर केली. त्यात १५ टक्के महिलांचा समावेश आहे. शहर आणि परिसरातील विधान सभा मतदारसंघाचे अध्यक्ष जाहीर करताना पर्वती मतदारसंघाच्या अध्यक्ष निवडीवरून पेच निर्माण झाला असून पक्षाचे नेते आणि पालकमंत्री अजित पवार तो सोडविणार आहेत.

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत कार्याकारिणी जाहीर केले. त्यांच्यासमवेत पक्षाचे नुतन प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते. जगताप म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची तयारी जोरात असून ही कार्यकारिणी त्याचाच एक भाग आहे. पक्ष एकसंधपणे महापालिका निवडणूक लढवून महापालिकेतील सत्ता परत मिळवेल.’’ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नानासाहेब नलावडे, शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी उदय महाले, खडकवासल्याच्या अध्यक्षपदी काका चव्हाण, कॅंटोन्मेंटच्या अध्यक्षपदी आनंद सवाणे, कसब्याच्या अध्यक्षपदी गणेश नलावडे, कोथरूडच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन मानकर, हडपसरच्या अध्यक्षपदी डॉ. शंतनु जगदाळे यांची नियुक्ती झाली आहे.

पक्षाने ७३ उपाध्यक्ष, ५७ सरचिटणीस, ४१ चिटणीस, ३३ संघटक सचिव नियुक्त करण्यात आले आहेत. खजिनदारपदी ॲड. नीलेश निकम, प्रसिद्धीप्रमुख अमोघ ढमाले, तर प्रवक्तेपदी विशाल तांबे, महेंद्र पठारे, योगेश ससाणे, प्रदीप देशमुख, ॲड. भैय्यासाहेब जाधव यांची नियुक्ती झाली आहे. तर, २८ कार्यकर्त्यांची प्रदेश प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहे.

पक्षाचे विद्यमान खासदार, आमदार, माजी आमदार, शहराध्यक्ष, माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर विद्यमान व माजी नगरसेवक यांची कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदासाठी चुरस असल्याने त्याचा निर्णय अजित पवार घेतली, असे जगताप यांनी सांगितले. महिला सेलच्या अध्यक्षपदी मृणालिणी वाणी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

loading image
go to top