

Pune NCRA question paper leak news
esakal
Pune Paper Leak: पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (NCRA) संस्थेतील कर्मचाऱ्याविरोधात भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक बबन हडवळे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर Official Secrets Act आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) च्या दक्षता विभागातील अधिकारी वैभव पांडुरंग शेरकर (३५) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.