
पुणे : प्रशासनातील सावळागोंधळ आणि नागरिकांच्या कमी सहभागामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा वाढून शहर अस्वच्छ होत आहे. त्यामुळे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी कार्यकाळातील पहिला उपक्रम शहर स्वच्छतेचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या दृष्टीने त्यांनी पावले टाकण्यास प्रारंभ केला.