

pune municipal corporation
esakal
Pune Latest News: राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी राज्य सरकारकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, महापालिकेकडून महापौर, उपमहापौर निवड, पहिल्या सभेसाठीची तांत्रिक तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडून विभागीय आयुक्तांना शुक्रवारी पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी महापौर, उपमहापौर निवड व नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा होऊन पुण्याला नवीन महापौर मिळण्याची शक्यता आहे.