New Year Drunk and Drive Crackdown in Pune
sakal
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर वाढलेल्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून एक जानेवारीच्या पहाटेपर्यंत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या २०८ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.