
राहू : राहू (ता.दौंड) येथील राहू - टेळेवाडी रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलर चाकाखाली चिरडल्यामुळे एका तेरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज रविवार (ता. २७) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. ओम सोमनाथ ढमढेरे (वय १३) राहणार राहू (ता. दौंड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.