Pune News: पुणेकरांच्या चिंतेत वाढ! जानेवारीपासून पुण्यात आढळले H3N2 विषाणूचे 162 रुग्ण; एकाचा मृत्यू Pune News | Marathi Breaking News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune H3N2 Update

Pune News: पुणेकरांच्या चिंतेत वाढ! जानेवारीपासून पुण्यात आढळले H3N2 विषाणूचे 162 रुग्ण; एकाचा मृत्यू

Pune H3N2 Update : देशभरात सध्या जीवघेण्या H3N2 व्हायरसनं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये या व्हायरसमुळं एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु होते.

जानेवारीपासून पुणे शहरात 162 तर पिंपरी-चिंचवडमध्ये चार H3N2 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान आता पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सावध झाल्या आहेत. शहरात कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सरकारी रुग्णालयात H3N2 रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाच खाटा राखीव ठेवल्या आहेत. तर पुणे महानगरपालिकेने H3N2 रुग्णांच्या उपचारासाठी एकूण 250 खाटा राखून ठेवल्या असल्याची माहिती मिळते.

तर नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालयात H3N2-संक्रमित रुग्णांसाठी 50 अलगाव खाटा राखून ठेवल्या आहेत. जुन्या बाणेर रुग्णालयात सुमारे 200 खाटा ठेवण्यात आल्या आसून जर गरज पडलीच तर अजून वाढवण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.

abp माझाच्या वृत्तानुसार...

सध्या राज्यातच नव्हे, तर देशभरात H3N2 चा संसर्ग वाढताना दिसत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या काही मोठ्या शहरांमध्ये या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. मार्च महिन्यातल्या पहिल्या 15 दिवसांमध्ये मुंबईत या विषाणूचे 53 रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यातला एक रुग्ण अहमदनगरचा तर दुसरा नागपूर इथला आहे.