Pune Latest News: पानशेत धरणात दुर्घटना; दोन मित्र पोहायला गेले पण एकजण परतलाच नाही

मयत मोहनीस व त्याचा भाऊ शुभम यांच्यासह मित्रांचा ग्रुप पानशेत धरण परिसरामध्ये आज रविवारी सकाळी फिरण्यासाठी आले होते. दरम्यान काहीजण धरणाच्या कडेला गाणी ऐकत गप्पा मारत बसले होते.
Pune Latest News: पानशेत धरणात दुर्घटना; दोन मित्र पोहायला गेले पण एकजण परतलाच नाही
Updated on

वेल्हे: पानशेत धरण आंबेगाव खुर्द (ता.राजगड) येथील पाणलोट धरण क्षेत्रामध्ये पोहताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.०६) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली असून मोहनीस विजय बोलाटे (वय.३७) सध्या राहणार येरवडा,पुणे असे मयताचे नाव असून आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धरणातून मृतदेह बाहेर काढला या प्रकरणी तरुणाचा भाऊ शुभम विजय बोलाटे याने वेल्हे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com