मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बस-ट्रक अपघातात ३ ठार

भाऊ म्हसाळकर
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

साहिल श्रीपती पवार (वय १६), तानाजी पांडुरंग नाईकवाडे (वय ३५), उमेश आबा नाईकवाडे (वय २२, रा. ठाणे मूळ राहणार चरण, ता. शिराळा, जि. सांगली) अशी मयतांची नावे असून अन्य पाच जण जखमी आहेत. त्यांची नावे अद्याप समजलेली नाही.

पुणे : लोणावळ्याजवळील बोरजजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उभ्या बसवर ट्रक आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर पाच प्रवासी जखमी झाले आहे.  आज (सोमवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

साहिल श्रीपती पवार (वय १६), तानाजी पांडुरंग नाईकवाडे (वय ३५), उमेश आबा नाईकवाडे (वय २२, रा. ठाणे मूळ राहणार चरण, ता. शिराळा, जि. सांगली) अशी मयतांची नावे असून अन्य पाच जण जखमी आहेत. त्यांची नावे अद्याप समजलेली नाही.

बस मुंबईवरून पुण्याकडे येत होती, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक बसवर आदळून हा अपघात झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Pune news accident on Mumbai-Pune express highway, 3 dead

टॅग्स