Video: पुण्यातील पाषाण-सुस रोडवर भीषण अपघात; पाच जण जखमी, 7 गाड्यांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident news

Video: पुण्यातील पाषाण-सुस रोडवर भीषण अपघात; पाच जण जखमी, 7 गाड्यांचे नुकसान

पुणे - पुण्यात सातत्याने मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच पाऊस वाढल्याने देखील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यातच आज पाषाण-सुस परिसरात भीषण अपघात झाला असून यामध्ये सात ते आठ गाड्यांचे नुकसान झालं आहे. (Accident news in Marathi)

हेही वाचा: Nirmala Sitharaman: रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; सीतारामन यांचं अजब विधान

पुण्यातील पाषाण सुस रोडवर एका मागोमाग एक गाड्या धडकल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ७ ते ८ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात शिवशाही बससह अनेक चार चाकी गाड्यांचा समावेश आहे.

बोरिवली ते सातारा शिवशाही बसचा गाडीचा अचानक ब्रेक फेल झाला. यामुळे एसटी ने समोर असलेल्या गाड्यांना धडक दिली. या धडकेत ४ ते ५ जण जखमी असून त्यांना नाजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. चार चाकी गाड्यांसह एका मोटार बाईकचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.