Pune News: अपघात स्पॉट धोकादायक; भरघाव जड वाहतुक अपघातास कारणीभूत

खराडी जुना जकातनाका परिसरातील नागारीकांचे म्हणणे | According to the citizens of Kharadi Juna Zakatnaka area
Pune News: अपघात स्पॉट धोकादायक; भरघाव जड वाहतुक अपघातास कारणीभूत

Juna Zakatnaka area : ज्या स्पॉट वर सोमवारी रात्री अपघात होवून दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला. त्या खराडी परिसरातील जुना जकात नाका भागात धोकादायक स्थिती आहे. रस्त्यात खडी पडलेली असते. जड वाहतुकीला बंदी असताना ही भरघाव वाहतुक होते. यामुळेच अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महालक्ष्मी लॉन्स शेजारी मोठ्या प्रमाणावर कॉक्रीट मिक्चरचे प्लांट आहेत. ते लोकवस्तीत असल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. खडी वाहतूक करणाऱ्या डंपर मधून मोठ्या प्रमाणात खडी रस्त्यावर सांडते.

त्या खडी वरून घसरून दुचाकी धारकांचा अपघात होतो. कॉक्रीट मिक्चर ची वाहने विरुद्ध दिशेने वाहतुक करतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात वारंवार घडतात. या परिसरात अनेक अतिक्रमणे आहेत. त्याकडे महापालिका दुर्लक्ष करते. त्यामुळे रस्ताही अरुंद होतो.

येथील चौकात वाहन चालक वाहतूक नियमांचा भंग करतात. जकात नाका पासून तुळजाभवानी नगर च्या दिशेने जाणारा रस्ता अरुंद आहे या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात अपघात होतात. नगर रस्त्यावर लोक वस्तीत व गर्दीच्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग आहेत. त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

वाहनांचा विशेषतः जड वाहनांची गती अती असते. यामध्ये डंपरचे ही प्रमाण अती आहे. त्यांची मर्यादेपेक्षा जास्त गतीच अपघाताला करणी भूत ठरत आहे. यापूर्वीही या परिसरात अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. वाहतूक विभाग व महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

जुना जकात नाका परिसरात अत्यंत धोकादायक स्थिती आहे. अती वेगाने व वाहतुकीला बंदी असतानाही होणारी जड वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

एस आनंद, नागरिक, जुना जकात नाका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com