
पुणे - खुनाचा प्रयत्न, दरोड्यासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या वानवडीतील एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबतचा आदेश दिला.
टोळीप्रमुख गिरीश ऊर्फ सनी महेंद्र हिवाळे (वय 21, रा. काळेपडळ, हडपसर), आकाश संतोष भारती (वय 20, रा. साठेनगर, हडपसर), चेतन पांडुरंग ढेबे (वय 23, रा. महादेवनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता), अनिकेत ऊर्फ मॉन्टी शरद माने (वय 20, रा. साठेनगर, हडपसर), काजल मधुकर वाडकर (वय 21, रा. वाडकर मळा, हडपसर), अंबिका अर्जुन मिसाळ (वय 21, रा. साठेनगर, हडपसर), सूरज महादेव नवगिरे (वय 19, रा. सावतामाळी चौक, उरुळी देवाची) अशी ‘मोक्का' अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून हत्यारासह खुनाचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा, खंडणी वसूल करणे, घातक शस्त्र विनापरवाना बाळगणे या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या संघटित गुन्हेगारीमुळे संबंधित परिसरातील नागरिक, व्यापारी यांच्या जीवितास व मालमत्तेस धोका असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
फिर्यादी नागेश पंढरीनाथ मिसाळ याच्या भावाने त्याचा मित्र अक्षय सोनवणे याचा खून केल्याचा व फिर्यादीच्या महिला नातेवाईकाला आरोपीने अनिकेत माने याच्यासोबत फिरू नको, असे म्हणल्याच्या रागातून फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या टोळीचा मुख्य सूत्रधार गिरीश हिवाळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध मागील दहा वर्षात दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. संबंधित गुन्हे टोळीतील अन्य साथीदारांच्या संगनमताने केले आहेत. हिवाळे हा गुन्हा घडल्यापासून फरारी होता. वानवडी पोलिसांनी त्यास शिताफीने पकडून अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.