Pune News : रोहन चव्हाणसह टोळीतील पाच साथीदारांवर मोका कायद्यान्वये कारवाई

या गुन्ह्याचा तपास करताना आरोपींविरुद्ध इतर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
crime Despite taking moka action koyta gang terror pune
crime Despite taking moka action koyta gang terror puneesakal
Updated on

पुणे - बुधवार पेठेतील व्हिडिओ पार्लरमध्ये तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करीत दुकानातील रोकड लुटणाऱ्या गुंड टोळीतील पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरात मोका कायद्यान्वये केलेली ही ८१ वी कारवाई आहे.

बुधवार पेठ येथील दत्त मंदिराच्या बाजूच्या गल्लीत व्हिडिओ पार्लरमध्ये ११ ऑक्टोबर रोजी रोहन चव्हाण याच्यासह टोळीतील आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कामगारांना शिवीगाळ करत तलवारीचा धाक दाखवून गल्ल्यामधील साडेपाच हजारांची रोकड चोरून नेली होती. तसेच जवळच्या पान टपरीतूनही दीड हजारांची रोकड चोरली होती. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना आरोपींविरुद्ध इतर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी आरोपींविरुद्ध पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे मोकांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावास पाटील यांनी मंजुरी दिली.

crime Despite taking moka action koyta gang terror pune
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पत्नीसह गायलं, "तुझसे नाराज नहीं", व्हायरल व्हिडीओने वेधलं लक्ष

आरोपी किरण रमेश गालफाडे (वय २४ वर्षे, रा. मंगळवार पेठ), जतीन संतोष पवार (वय २१, रा. बिबवेवाडी), अक्षय संजय सगळगिळे (वय २०, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर रोहन जयदीप चव्हाण (टोळी प्रमुख), ऋषिकेश फुलचंद रवेलिया (वय २१, रा. लोहगाव) आणि रोहनचा एक साथीदार अद्याप फरार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com