esakal | Pune: अस्तरीकरणासाठी हवेत ३०० कोटी : अशोक पवार
sakal

बोलून बातमी शोधा

ॲड. अशोक पवार

अस्तरीकरणासाठी हवेत ३०० कोटी : अशोक पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्हावरे : चासकमान प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना हेड टु टेल सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यासाठी अस्तरीकरण होणे गरजेचे असल्यामुळे त्यासाठी ३०० कोटींची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केल्याची माहिती आमदार ॲड. अशोक पवार यांनी दिली.

आबंळे (ता. शिरूर) येथे १० कोटी खर्चाच्या चासकमान डावा कालवा अस्तरीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे होते. आमदार पवार पुढे म्हणाले, कालव्याची दुरवस्था असल्याने कालव्यातून ९५० क्युसेकने पाणी सोडण्याऐवजी फक्त ५५० क्युसेकने पाणी सोडावे लागते. गळती होत असल्यामुळे टेलच्या बाजूला फक्त १०० क्युसेकने पाणी येते. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे अस्तरीकरणासाठी ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : झटापटीनंतर रावण गँगचे चौघे जेरबंद; पोलिसांची धाडसी कारवाई

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, चासकमानचे उपअभियंता आर. जे. भावसार, शाखा अभियंता राजेंद्र गोरे, सरपंच सोमनाथ बेंद्रे, कळवंतवाडीचे सरपंच दादासाहेब चव्हाण, प्रकाश बेंद्रे, बाळासाहेब वाघचौरे, तात्या काळे, अशोक कोळपे यांची भाषणे झाली. यावेळी शिरूर बाजार समितीचे सभापती ॲड वंसतराव कोरेकर, सागरराजे निंबाळकर, प्रा.भाऊसाहेब भोसले, विलासराव बेंद्रे, न्हावऱ्याच्या सरपंच अलका शेंडगे, माजी सरपंच अतुल बेंद्रे, उपसरपंच सुनीता जाधव, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गोरक्ष बेंद्रे, सूत्रसंचालन प्रवीण दौंडकर यांनी केले. आभार दीपक बेंद्रे यांनी मानले.

loading image
go to top