रिक्षात विसरलेले ४ किलो चांदीचे दागिने सराफाला सुपूर्द

सचिन कोळी
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

दिनेश जयंतीलाल ओसवाल (वय ४३, रा. निरा,ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी मंगळवारी पुण्यातील रविवार पेठेतून ४ किलो वजनाच्या सुमारे दीड लाख रूपयांच्या पायातील चांदीच्या पट्टया खरेदी केल्या होत्या. खरेदी झाल्यानंतर ते निरेला परत जाण्यासाठी रिक्षात बसले. सेव्हन लव्हज चौकात ते उतरले आणि पुढच्या प्रवासाला निघून गेले.

पुणे : पुण्यात खरेदी केलेले चांदीचे दागीने रिक्षात विसरून गेलेल्या निरा येथील सराफी व्यापाऱ्याचे ४ किलो चांदीचे दागिने भारती विद्यापीठ पोलिसांच्या सहकार्याने रिक्षाचालकाने परत केले.

दिनेश जयंतीलाल ओसवाल (वय ४३, रा. निरा,ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी मंगळवारी पुण्यातील रविवार पेठेतून ४ किलो वजनाच्या सुमारे दीड लाख रूपयांच्या पायातील चांदीच्या पट्टया खरेदी केल्या होत्या. खरेदी झाल्यानंतर ते निरेला परत जाण्यासाठी रिक्षात बसले. सेव्हन लव्हज चौकात ते उतरले आणि पुढच्या प्रवासाला निघून गेले.

रिक्षाचालक बाजीराव ज्ञानोबा शिळीमकर (रा. गणेश चौक, धनकवडी) हे घरी आल्यानंतर त्यांना दिनेश ज्वेलर्स निरा असे लिहिलेली पिशवी रिक्षात आढळली. बुधवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जावूनशिळीमकर यांनी ती पिशवी पोलिसांकडे दिली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक कमलाकर ताकवले यांनी पिशवीवरील पत्त्यावरून संबंधित सराफाचा शोध लावला. त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्याचे दागिने परत केले. रिक्षा चालक शिळीमकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सराफी ओसवाल यांनी बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली.

Web Title: Pune news auto driver return silver to traders