Pune Water Supply : पाणी सोडण्यासाठी स्वयंचलित व्हॉल्व्ह; पुणे शहरात सुमारे ३०० व्हॉल्व्ह बसविण्यात येणार

पुणे महापालिकेचा निर्णय : पाणी पुरवठा करताना कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप कमी
pune news automatic valve for water supply 300 valves will installed in Pune city
pune news automatic valve for water supply 300 valves will installed in Pune city sakal

पुणे : पाणी पुरवठा करताना कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप कमी करून नियमानुसार सर्व भागात व्यवस्थित पाणी पुरविण्यासाठी पुणे महापालिकेने स्वयंचलित व्हॉल्व्ह’ बसविण्याचे काम सुरू केले आहे. पुणे शहरात सुमारे ३०० व्हॉल्व्ह बसविण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये ८५० किलोमीटरची जलवाहिनी, ४२ टाक्या बांधून पूर्ण, एक लाख १० हजार पाण्याचे मिटर बसविणे यासह इतर कामांचा समावेश आहे. शहरात सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्येक भागातील व्हॉल्व्ह हाताने फिरवावे लागतात.

त्यामुळे दिवसा आणि रात्री कर्मचाऱ्यांना या कामात गुंतून पडावे लागते. तसेच यामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे पाणी पुरवठा करताना काही भागात जास्त दाबाने, जास्त वेळ पाणी देणे, तर काही सोसायट्यांना कमी पाणी सोडणे, दाब कमी ठेवणे असे प्रकार वारंवार घडतात.

तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे देखील पाणी पुरवठा विस्कळित होतो. यासंदर्भात नागरिक पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार करतात. त्यानंतर काही दिवस पाणी पुरवठा सुरळीत होतो, त्यानंतर पुन्हा त्रास सुरू होतो अशी स्थिती शहरात आहे.

हे अडथळे दूर करण्यासाठी समान पाणी योजनेतून शहरातील जुन्या आणि नव्या अशा १२५ पाण्याच्या टाक्यांच्या मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविले जाणार आहेत. त्याला ‘अॅक्च्युएटर’ हे तंत्रज्ञान बसविले जाणार असल्याने ‘स्काडा’ प्रणालीला जोडले जाणार आहे.

पाणी सोडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्‍चित केल्यानंतर रिमोटद्वारे पाणी पुरवठ्यावर नियंत्रण केले जाईल. तसेच एखाद्या भागात पाण्याचा दाब कमी ठेवायचा की जास्त करायचा हे देखील ऑनलाइन करता येणार आहे.

सध्या विमाननगर येथील पाण्याच्या टाकीवर तीन स्वयंचलित व्हॉल्व्ह बसविले आहेत. बाणेर-बालेवाडी येथे दोन वॉल्व्ह बसविण्याचे काम सुरू आहे. पुढील काळात तीनशे ठिकाणी हे व्हॉल्व्ह बसविले जाणार आहेत. या एका व्हॉल्व्हची किंमत सव्वालाख रुपये आहे.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com