pune news
pune newssakal

Pune News : नारायणगाव,वारूळवाडी परिसरात बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अत्यावश्यक सेवा वगळता व्यवसायिकांनी आज दुपारपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.

नारायणगाव - जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटना व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला आज नारायणगाव,वारूळवाडी(ता. जुन्नर ) परिसरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अत्यावश्यक सेवा वगळता व्यवसायिकांनी आज दुपारपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बंद शांततेत पार पाडण्यात आला. कोठेही अनुचित घटना घडली नाही. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी दिली.

pune news
Aparna P Nair Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू! घरात सापडला मृतदेह

जालना येथे मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाचे प्रतिनिधी माजी सरपंच योगेश पाटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, जितेंद्र गुंजाळ, संतोष वाजगे,महेश शिंदे, आकाश बोरकर यांनी नारायणगाव वारूळवाडी परिसरात बंद पाळण्याचे आवाहन केले होते. परिसरातील व्यवसायिकांनी दुपारपर्यंत सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.

pune news
Jalna Maratha Protest Violence: नामपूरला राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

याबाबत माजी सरपंच पाटे म्हणाले आरक्षणा संदर्भातील आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाचे प्रतिनिधी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. लाठी हल्ला करण्याची गरज नसताना अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हल्ला करणाऱ्या दोषीवर कारवाई न झाल्यास शिवजन्मभूमीत तीव्र आंदोलन करण्यात येईल. मनसेचे जिल्हाध्यक्ष पाटे म्हणाले सरकारच्या पाठिंब्याशिवाय पोलीस लाठी हल्ला करू शकत नाहीत. हा हल्ला नियोजनबद्ध होता. ही घटना निंदनीय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com