साहेब लक्ष देत नाही म्हणून, क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेरच बसले 'शौचाला' |pune news bibwewadi public space toilet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune News: साहेब लक्ष देत नाही म्हणून, क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेरच बसले 'शौचाला'

Pune News: सरकारी काम आणि थोडावेळ थांब ही म्हण अनेकांना माहिती असेलच. लाल फितीतील कारभार कशाप्रकारे चालतो याचा प्रत्यय कित्येकांनी घेतला असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या तरुणांनी आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नाही म्हणून जे काही केलं आहे त्याची चर्चा होताना दिसते आहे.

साहेब आमच्या मागण्यांची दखल घेत नाही, आम्ही काय म्हणतोय ते ऐकून घेत नाही असे म्हणत आंदोलनकर्त्यांना अखेर आपला राग वेगळ्याच प्रकारे व्यक्त करावा लागलाय. त्यांनी प्रशासनानं आपली दखल घ्यावी यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर शौचाला बसावे लागले आहे. पुण्यातील बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा तो व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी येथील शौच्छालयाच्या दुरावस्थेबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे गेले 8 महिने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र त्याकडे प्रशासनानं काही लक्ष दिले नाही. अशी तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Pune News : पुणे पालिकेत औषधांचा खडखडाट; रुग्णांचे प्रचंड हाल

प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे पतित पावन संघटना पुणे शहर द्वारे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी नैसर्गिक विधीचा हक्क नाकारणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच प्रतीकात्मक शौचालयला बसून निषेध नोंदवण्यात आला. क्षेत्रीय कार्यालयाचे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलवून घेऊन सर्व मागण्या मान्य करत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तत्वतः मोर्चा स्थगित करण्यात आला.

हेही वाचा: Drunk Pune Police: पुण्यात पोलिसांचा दारू पिऊन धिंगाणा! हॉटेल मालकाला धमकावलं