

Controversy Over Morphed Video of Dog Harassment in Pune
पुणे : श्वानासोबत लैंगिक छेडछाड केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्यावर वडकी येथील श्वानांचे निवारागृह चालवणा–या युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर संस्थेकडून फुरसुंगी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संस्थेच्या मते समाजमाध्यम वापरकर्त्याने मूळ चित्रफितीमध्ये बदल करून (मॉर्फ) तो विकृत स्वरूपाचा केला असून त्याने बदनामी करण्याच्या दृष्टीने प्रसारित केल्याचा आरोप केला आहे. यावरून श्वानप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.