डॉ. बानू कोयाजी स्मृती समारंभाचे आयोजन  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. बानू कोयाजी स्मृती समारंभाचे आयोजन 

डॉ. बानू कोयाजी स्मृती समारंभाचे आयोजन 

पुणे - के.ई.एम. हॉस्पिटल आणि "सकाळ पेपर्स'च्या माजी संचालक डॉ. बानू कोयाजी स्मृती समारंभ "सकाळ प्रकाशन' आणि के.ई.एम. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (ता. 17) सायंकाळी साडेपाच वाजता साजरा होत आहे. 

"सकाळ'च्या बुधवार पेठ कार्यालयातील सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार असतील. के.ई.एम. हॉस्पिटलचे संचालक डॉ. कुरुस कोयाजी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. डॉ. बानू कोयाजी यांची जन्मशताब्दी 7 सप्टेंबर रोजी होती, या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे. 

डॉ. कोयाजी यांनी महिला आणि बालकल्याण, कुटुंबनियोजन, ग्रामीण आरोग्य या क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रॅमन मॅगसेसे पुरस्काराने तर राष्ट्रीय स्तरावर पद्मभूषण पुरस्काराने गौरवले गेले. त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणारे डॉ. प्रतिभा कुलकर्णी लिखित "बानूबाई' हे चरित्रपर पुस्तक या कार्यक्रमात "सकाळ'तर्फे प्रकाशित होईल. 

डॉ. कोयाजी यांच्यासोबत विविध क्षेत्रांत काम केलेले के. मो. भिडे, डॉ. आनंद पंडित, डॉ. लैला गार्डा, दिलीप दीक्षित हे मान्यवर या प्रसंगी बानूबाईंच्या स्मृती जागवतील. 

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल. अधिक माहितीसाठी संपर्क -020-24405678 किंवा 8888849050 

loading image
go to top