संभाजी उद्यानात वा. सी. बेंद्रेंचा पुतळा बसवा - डॉ. सदानंद मोरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - ""छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे गैरसमज होते, ते इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी खोडून काढले. त्यामुळे संभाजी उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांच्याऐवजी बेंद्रे यांचा पुतळा उभारा,'' अशी मागणी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी केली. संभाजी महाराजांचे खरे चरित्र लोकांसमोर आणणारे बेंद्रे हे खरे "हिरो' आहेत, असेही ते म्हणाले. 

संभाजी उद्यानातील गडकरी यांचा पुतळा काही कार्यकर्त्यांनी जानेवारीत अचानक हटवला. त्यानंतर या कृर्त्याचे समर्थन करणारे आणि निषेध करणारेही गट समोर आले. त्यामुळे एकूणच हे प्रकरण वादाचे ठरले. या विषयावर डॉ. मोरे यांनी नवा पर्याय सुचवला. त्यामुळे गडकरी पुतळा प्रकरणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 

डॉ. मोरे म्हणाले, ""गडकरी यांनी त्या काळात "राजसंन्यास' लिहिले. ते त्यांनी कल्पनेने लिहिले, असे नाही. त्या काळात संभाजी महाराजांची प्रतिमाच दुर्दैवाने तशी होती. तोपर्यंत खरा इतिहास लोकांसमोर आलेला नव्हता. त्यामुळे गडकरीच नव्हे इतरांनीही संभाजी महाराजांबाबत लिहिले असते तर ते तसेच झाले असते; पण अलीकडच्या काळात खरा इतिहास समोर आलेला आहे. त्यामुळे गडकरी यांचा पुतळा हटवा, अशी मागणी कोणी करत असेल तर ती औचित्यभंग ठरणारी नाही. संभाजी महाराजांच्या उद्यानात चुकीची गोष्ट आपण कशी ठेवू शकतो.'' 

गडकरी हे श्रेष्ठ नाटककार होते, हे जगमान्य आहे. त्यांनी मुद्दाम किंवा जाणूनबुजून संभाजी महाराजांबद्दल लिहिले नाही. हेही आपल्याला मान्य करावे लागेल. मराठा आणि कायस्थ प्रभू यातील कुठल्याही जातीची अस्मिता दुखावली जाऊ नये, दोन्ही जातीला न्याय द्यायचा असेल तर संभाजी महाराजांच्या मुख्य पुतळ्याबरोबरच बेंद्रे यांचा पुतळा तेथे बसवावा लागेल. बेंद्रे हे स्वत: कायस्थ प्रभू होते. याशिवाय हे उद्यान पूर्ण होऊ शकणार नाही; पण तेथे गडकरींचा पुतळा बसवला तर पुन्हा जातीय वळण लागू शकते. हे आपण टाळू शकतो, असेही ते म्हणाले.

Web Title: pune news Dr. Sadanand More