Pune News : संभाजी उद्यानात किल्ले प्रदर्शन आजपासून खुले

महापालिकेतर्फे दिवाळीनिमित्त दरवर्षी किल्ले बनविण्याची स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा या उपक्रमाचे यंदाचे २९ वे वर्ष आहे
pune
punesakal
Updated on

पुणे - महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये किल्ले स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन गुरवारी (ता. ९) दुपारी चारपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले होणार असून, १९ तारखेपर्यंत याचा आनंद घेता येणार आहे. या प्रदर्शनात जल, भुईकोट, डोंगरी किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.

महापालिकेतर्फे दिवाळीनिमित्त दरवर्षी किल्ले बनविण्याची स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा या उपक्रमाचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. शहरीकरणामुळे अपुरी जागा असल्याने मुलांना दिवाळीत किल्ले बनविण्यासाठी जागा मिळत नाही. मुलांमध्ये इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांच्या कलागुणांना सादरीकरणाची संधी मिळावी यासाठी १९९२ पासून हे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली आहे.

यंदाच्या वर्षी या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला असून, त्यांचे परिक्षण इतिहासतज्ज्ञ आणि भूगोलतज्ज्ञांकडून केले जाणार आहे. बक्षीस वितरण व प्रदर्शनाचे उद्‍घाटन उद्या (ता.९) सायंकाळी साडे चार वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या संकेतस्थळाचे व आॅनलाइन तिकीट बुकिंगचे उद्‍घाटनही आयुक्तांच्या हस्ते होणार आहे.

pune
Pune Crime : पुण्यातील राजुरी येथे चोरटयांनी ३ घरे फोडली; वृध्द महिलेस मारहाण, दागिने व रोख रक्कम लंपास

यंदाच्या वर्षी प्रदर्शनात सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, सिंहगड, शनिवारवाडा, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, तोरणा, अंतुरगड, सज्जनगड, सिंधुदुर्ग, कोरीगड, पारांडा, मल्हारगड, जंजिरा, पुरंदर या किल्ल्यांच्या हुबेहुब प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com