पुणे : माझ्या मुलीची चूक काय? आईचा आर्त सवाल

पुणे : माझ्या मुलीची चूक काय? आईचा आर्त सवाल

कोथरूड - ‘‘माझी मुलगी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करत गाडी चालवते. गुरुवारी ब्रेक फेल झालेल्या पीएम बसने तिला धडक दिली व ती जखमी झाली. सुदैवाने ती वाचली; पण मला सांगा यामध्ये माझ्या मुलीची चूक तरी काय आहे? तिच्या पायाला दुखापत झाली आहे. दवाखान्याचा खर्च पस्तीस हजार आला आहे. नोकरदार वर्गाकडे एकदम एवढे पैसे कोठून येणार, असा प्रश्‍न विचारला आहे बस अपघातात जखमी झालेल्या शशी चिंतामणी दंडवते (वय २०, रा. परमहंसनगर) हिची आई ॲड. कविता दंडवते यांनी. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुरुवारी (ता.२०) कोथरूड डेपो ते अप्पर डेपो ही बस घेऊन चालक बापू किसन औटे पौड रस्तामार्गे अप्पर डेपोकडे निघाले होते. दरम्यान, बस नियंत्रणाबाहेर गेल्याने ती रस्त्यावरील वाहनांना धडक देत पुढे जाऊन मेट्रोच्या बॅरिकेडसला धडकून थांबली. यामध्ये दहा वाहनांचे नुकसान झाले व आदिती कुलकर्णी व शशी दंडवते जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

शशी दंडवते हिने सांगितले की, वनाज कॉर्नर येथून वळून परमहंसनगरकडे निघाले होते. तेवढ्यात कसला तरी जोरदार आवाज झाला. गाडी बाजूला घेईपर्यंत बसने मला धडक दिली होती. मी दुचाकीसह बाजूला उडाले. त्यामुळे पायाला जरी दुखापत झाली असली तरी वाचले. एक गाडी तर बसच्या धडकेने जागेवरच गरगर फिरत होती; तसेच आदिती कुलकर्णी (वय ४०) या आपल्या पतीसह दुचाकीवरून निघाल्या होत्या. या दांपत्यालाही बसने धडक दिली. यामध्ये आदिती यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

परमहंसनगर येथील रहिवासी सीताराम खाडे म्हणाले की, मेट्रोमुळे येथे रोज खूप मोठी वाहतूक कोंडी असते. अशा रस्त्यावर जर महापालिका ब्रेक फेल होणाऱ्या बस सोडत असेल तर सर्वसामान्याचे जगणे अवघड होईल. पीएमपीच्या बस म्हणजे आम्हाला यमदूत वाटतात. महापालिकेने सार्वजनिक वाहतूकव्यवस्था व बसची अवस्था सुधारणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com