Pune News : प्रामाणिक घंटागाडीचालक सेवकामुळे सोन्याचे गंठण मिळाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune News : प्रामाणिक घंटागाडीचालक सेवकामुळे सोन्याचे गंठण मिळाले

उंड्री : मार्गशिर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारची पूजा झाल्यानंतर निर्माल्याबरोबर घंटागाडीमध्ये नकळत सोन्याचे मिनी गंठण टाकले गेले. मात्र, काही वेळात गंठण गेल्याचे लक्षात येताच उंड्री (प्रभाग क्र.४२) बिगारी विश्वास लोखंडे आणि मंगेश वाघमारे यांच्याकडे फोनवरून विचारणा केली. त्यावेळी त्यांनी घंटागाडी परत घरी आणली, तर त्यामध्ये मिनी गंठन मिळाल्याचे अलका कैलास टकले (पुणेकर मळा, उंड्री) यांनी सांगितले.

टकले म्हणाल्या की, मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारची (दि. २४ नोव्हेंबर, २०२२) पूजा झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २५ नोव्हेंबर, २०२२) सकाळी साडेआठच्या सुमारास निर्माल्याबरोबर मंगळसूत्रही घंटागाडीमध्ये दिले. काही वेळातच मंगळसूत्रही निर्माल्याबरोबर दिल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब घंटागाडीच्या चालकाला फोन केला. त्यानंतर मुकादम घंटागाडी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी मिनी गंठण त्यामध्ये आढळून आले. गंठण परत मिळताच टकले यांनी बिगारी सेवक विश्वास लोखंडे आणि मंगेश वाघमारे यांना बक्षीस देऊ केले. मात्र, त्यांनी ते नाकारले.

दरम्यान, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, जालिंदर चांदगुडे यांनी मुकादम दयानंद पाटोळे, चालक योगेश कामठे, विश्वास लोखंडे आणि मंगेश वाघमारे यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Pune Newspune