ajit pawar
ajit pawar sakal

Pune News :पुण्याप्रमाणे बारामतीतही मिळकत धारकांसाठी लॉटरी योजना राबवा- अजित पवार

अजित पवार यांनी रविवारी (ता. 22) विविध विकासकामांची पाहणी करुन प्रशासनाला विविध सूचना केल्या.
Published on

बारामती - पुणे महानगरपालिका क्षेत्रात सन 2023-2024 या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी लॉटरी योजना राबवून विजेत्या मिळकतधारकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्याप्रमाणे बारामती नगरपरिपरिषदेनेही कार्यवाही करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केली.

अजित पवार यांनी रविवारी (ता. 22) विविध विकासकामांची पाहणी करुन प्रशासनाला विविध सूचना केल्या. आगामी काळातील वीजेची गरज लक्षात घेत या पुढे तालुक्यातील प्रत्येक नवीन शासकीय इमारतीचे नियोजन करताना त्यामध्ये सौर पॅनेलचा समावेश करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

बारामती परिसरातील मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ग्रंथालय, जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निर्यात केंद्र व कार्यालयीन इमारत, जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कालव्याचे सुशोभीकरणाची सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.

ajit pawar
Ajit Pawar : ''शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा, हे आमचं ब्रीदवाक्य'', शरद पवारांसमोर अजित पवार नेमकं काय बोलले?

पवार म्हणाले, नवीन प्रशासकीय भवन शेजारी उभारण्यात येणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे काम वेळेत पूर्ण करावे. इमारतीचा परिसर स्वच्छ करुन घ्यावा. नवीन कारागृहाची कामे लवकर सुरु करावीत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत ग्रंथालयाच्या इमारतीचे काम शैक्षणिक क्षेत्राला शोभेल असे आणि ग्रंथालयात पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com