Pune News : गावोगावी साखळी उपोषण व गावबंदी नंतर राजकीय नेत्यांकडून आंदोलनस्थळी भेटीचे धोरण

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्य़ा वतीने सुरू
junnar
junnarsakal

जुन्नर - मराठा आरक्षणासाठी जुन्नर तालुक्याच्या अनेक गावांतील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देत गावोगावी साखळी उपोषण सुरू केले आहे. याच बरोबर राजकीय पक्ष्याच्या नेत्यांना गावबंदीचे फलक लावले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे दिसून येत आहे.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्य़ा वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांनी आज ता.२९ रोजी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला आहे.

जुन्नर परिसरातील ३० हुन अधिक गावातील मराठा समाज बांधवांनी दररोज एक दिवस याप्रमाणे साखळी उपोषणास सुरुवात केली आहे . दररोज बारा तास सुरु असलेल्या साखळी उपोषणास शहर व ग्रामीण भागातील मराठा समाजातील महिला व तरुण यांचा सहभाग वाढत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सुरू असलेल्या साखळी उपोषणाची दखल सर्वच राजकीय पक्षाच्या मराठा नेत्यांनी घेतली आहे.

junnar
Martha Kranti Morcha: अजित पवारांनी दिल्या घोषणा

आमदार अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष काँग्रेसचे सत्यशील शेरकर,भारतीय जनता पार्टीच्या आशा बुचके, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजणे, संचालक प्रियांका शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे,माजी सभापती बाजीराव ढोले, बाबा परदेशी,पापा खोत, संतोष खैरे,डॉ.विलास चव्हाण,अविनाश पुंडे,माध्यमिक शिक्षक परिषदेचे पदाधिकारी आदींनी भेट दिली.मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा निर्णय होईपर्यत हे उपोषण सुरु राहणार आहे असल्याचे सकल मराठा समाजाचे सुनील ढोबळे यांनी सांगितले.

junnar
Maratha Reservation : उपोषणकर्ते अन् सरकार तटस्थ! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

आमदार अतुल बेनके यांचा पाठींबा

आमदार अतुल बेनके यांनी आज रविवारी दुपारी आंदोलनस्थळी येवून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनास आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले. आरक्षण अभावी गुणवत्ता असूनही नोकरी व शिक्षण यात समाजाची पीछेहाट होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांनी विशेष अधिवेशन बोलवून कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी केली असून मराठा समाजाच्या ह्या प्रश्नासाठी राजीनामा देण्याची तयारी असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com