कोळशावरचा कुकर, बांबूचा स्पीकर, आदिवासी संस्कृती अन्‌ मातीची घरे 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 January 2018

पुणे - कोळशावरचा कुकर, घरगुती उपकरणे, कापडी पिशव्या, उसाच्या चिपाडापासून बनविलेले बाउल, कप, डिश, बांबूचा स्पीकर, सायकल, रानभाज्या, कंदमुळे, आदिवासी संस्कृती अन्‌ मातीची घरे यासारख्या पर्यावरणपूरक मानवी जीवनशैलीचे अनोखे दर्शन पुणेकरांना घडत आहे. तेही किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या "इको बझार' या प्रदर्शनात. 

घोले रस्त्यावरील पं. नेहरू सांस्कृतिक भवन येथे हे प्रदर्शन भरले असून, रविवार (ता. 6) पर्यंत खुले राहणार आहे. यात मुंबई, कोचीन, बंगळूर अशा विविध ठिकाणच्या पर्यावरणप्रेमींचे चाळीस स्टॉल आहेत. अगदी मातीची घरे आणि रानभाज्यांचे महत्त्व प्रदर्शनातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बालगोपाळांसाठी लाकडी खेळणी, गृहिणींसाठी कोळशावरचा कुकर, कोळसासुद्धा पालापाचोळ्यापासून बनविण्याचे उपकरण, दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणारी घरगुती उपकरणे, कापडी पिशव्या, स्त्रियांसाठी ड्रेस मटेरिअल, नाना तऱ्हेचे खाद्यपदार्थ, मधाचे प्रकार, आरोग्यविषयक साधने, आदिवासी संस्कृतीच्या नानाविध वस्तू आणि पर्यावरणाशी सुसंगत उत्पादने येथे ठेवण्यात आली आहेत. 

प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट म्हणाले, ""धकाधकीच्या जीवनातही पर्यावरणाचा विचार शिल्लक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी अनेक जण कार्य करतात. पण त्यांनाही त्यांच्या कार्याची कल्पना नसते. पर्यावरणातला धोका ओळखून अनेक जण पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे, की विनाशाऐवजी पर्यावरणपूरक जीवनशैली उपयुक्त आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news Kirloskar Vasundhara Film Festival environment