आपण ट्विट करायलाही घाबरतोय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे - ""इंदू सरकार'च्या वेळेला "बॉलिवूड'चेच लोक माझ्या बाजूने उभे राहिले नाहीत. बोलले नाहीत. त्यामुळे "पद्मावत'लाही त्याच समस्यांना सामोरे जावे लागले. "बॉलिवूड' गप्प राहिले. कारण आमच्या लोकांच्या मनातसुद्धा भीती आहे. ते खुलेपणाने पुढे येऊ शकत नाहीत. आजच्या तारखेला चित्रपटच काय आपण साधे "ट्विट' करायलाही घाबरतोय,'' अशा शब्दांत देशातील परिस्थितीकडे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी लक्ष वेधले. वाढत्या भीतीमुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांनी "आता चित्रपट बनवणे बंद कर,' असे मला सांगितले होते, असा अनुभवही त्यांनी सांगितला. 

"इंदू सरकार' चित्रपटाच्या निमित्ताने आशियाई चित्रपट महोत्सवात भांडारकर यांची संजय डावरा यांनी मुलाखत घेतली. त्यानंतर भांडारकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""एकदा चित्रपट "सेन्सॉर' झाला की तो चित्रपट प्रदर्शित व्हायलाच पाहिजे; पण आपल्याकडील अनेक संवेदनशील माणसे उठतात आणि वेगवेगळ्या तऱ्हेने आक्षेप घेतात. अशा प्रकारची "समांतर सेन्सॉरशिप' आत्ताच सुरू आहे, असे नाही. "मुस्तफा' चित्रपटाचे नाव बदलून "गुलाम-ए-मुस्तफा' ठेवावे लागले. "आतिष' चित्रपटातील गाण्यावर आक्षेप घेतला गेला होता. डिंपल कपाडियाचा "पती परमेश्‍वर', कमल हसन यांच्या "विश्‍वरूपम'लाही अडचणींचा सामना करावा लागला होता. सरकार कोणाचेही असो, अशा घटना घडत आलेल्या आहेत.'' 

डॉक्‍युमेंटरी बनवली, पुस्तक लिहिले की काही समस्या येत नाहीत. चित्रपट बनवले की मात्र लोकांच्या भावना लगेच दुखावतात. कोणी कथेवर, कोणी गाण्यावर, तर कोणी कपड्यांवर आक्षेप घेतो. हे प्रमाण गेल्या दहा वर्षांत चांगलेच वाढले आहे. कारण लोकांच्या हातात "सोशल मीडिया'सारखे माध्यम आले आहे. प्रश्‍न विचारणारे लोक वाढले आहेत. ट्‌विट केल्यानंतर आपण योग्यच केले आहे ना, कोणी आपल्याला ट्रोल तर करणार नाही ना, अशी भीती आता वाढली आहे. एकूणच हा कठीण काळ आहे, असेही ते म्हणाले. 

माझ्यात एक पत्रकार दडलेला आहे. फक्त मला मिळालेले विषय मी चित्रपटाच्या माध्यमातून दाखवतो आणि जे खरे आहे तेच मांडतो. 
- मधुर भांडारकर, दिग्दर्शक 

Web Title: pune news madhur bhandarkar twitter