Pune News : महाज्योतीच्या प्रशिक्षण परीक्षा ऑक्टोंबरमध्ये

प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
mahajyoti
mahajyoti sakal

पुणे - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) लोकसेवा आयोगांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. येत्या २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान या प्रवेश परीक्षा पार पडणार असल्याचे महाज्योतीने पत्रकाद्वारे कळविले आहे.

रंपरिक पद्धतीने वाजत गाजत ज्येष्ठा गौरीचे उत्साहात आगमन झाले.

लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), एमपीएससी संयुक्त गट-ब व क २०२३ आणि संघ लोकसेवा आयोग (युपीएससी)-२०२३ परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.

त्यानुसार कागदपत्रांची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. अनुक्रमे १२, १३ आणि १४ ऑक्टोबरला विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र उपलब्ध होणार असून, २५ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा संगणकाच्या साहाय्याने पार पडणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे, असे आवाहन महाज्योतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com