Pune Traffic News: महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतुक कोंडी

Pune traffice News| सुट्टी मुळे बाहेर पडणारया प्रवाशांचे हाल
Pune News: महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतुक कोंडी
महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतुक कोंडीsakal

Highway News: पुणे सातारा महामार्गावर आज रविवार 9 रोजी सकाळ पासुनच मोठ्या वाहतुक कोंडीला प्रवाशांना तोंड द्यावे लागत असुन गर्दीच्या पार्श्वभुमीवर योग्य नियोजन नसल्याने वाहनचालकांचे हाल होत आहे.

रविवारी सुट्टीमुळे मोठ्या संख्यने वाहन चालक बाहेर पडतात त्या प्रमाणे आज महामार्गावर वाहनांची सकाळ पासुनच मोठी गर्दी आहे महामार्गावर शिवरे व खेड-शिवापुर येथे उड्डाणपुलाचे काम चालु आहे.

Pune News: महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतुक कोंडी
Nashik Crime News : पिकअप मध्ये डांबून कत्तलीसाठी चाललेल्या 9 गायींची सूटका!

त्यामुळे वाहतुक शेजारील सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे या ठिकाणचा अरुंद रस्ता व त्यावर पडलेले खड्डे तसेच काल मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस यामुळे साठलेले पाणी या सर्व कारणाने अगोदरच संथ असलेली वाहतुक या ठिकाणी ठप्प झाल्या सारखीच आहे.

त्यामुळे शिवापुर पासुन वेळु,शिंदेवाडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तसेच शिवरे येथुन टोलनाक्या पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत त्या मध्येच टोलनाका या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झाली असुन सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या वाहन चालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

Pune News: महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतुक कोंडी
Nashik Crime News : पिकअप मध्ये डांबून कत्तलीसाठी चाललेल्या 9 गायींची सूटका!

सुट्टीच्या दिवशी दरवेळी वाढणारी वाहतुक नियंत्रीत करणे,रस्त्या मधील अडथळे दुर करणे हे रस्ता ठेकेदाराचे काम आहे परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारया ठेकेदारावर काहीच कारवाई होत नाही,महामार्ग वाहतुक शाखेचे पोलिस काहीवेळ थांबतात परंतु नेहमीचेच असल्याने ते देखिल कंटाळुन दुर्लक्ष करताना दिसतात

वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अस्लम खतिब यांनी माहीती देताना सांगितले कि, सेवा रस्त्याची खड्डांमुळे अक्षरशा चाळण झाली आहे,सकाळी गुडघाभर पाणी रस्त्यावर होते.

ठेकदाराला तातडीने रस्ता दुरुस्ती करावयास सांगितली तर त्याच्याकडे खड्डे बुजवण्यासाठी मटेरीअल नसल्याचा सांगत आहे वाहतुक पोलिसच रस्त्याच्या कडेला पडलेली खडी जेसीबीच्या सहाय्याने खड्डयात टाकुन रस्ता वाहतुकी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत एकुण तीन अधिकारी व दहा कर्मचारी वाहतुक सुरळीत करण्यासाठी धावपळ करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com