Mon, October 2, 2023

Pune : माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना बढती; भाजपच्या सरचिटणीसपदी नियुक्ती
Published on : 15 September 2022, 11:01 am
मुंबई : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपनं मोठी जबाबदारी सोपवली आहे. नगरसेवक आणि महापौर राहिलेल्या मोहोळ यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र जाहीर केलं आहे. (Pune news Muralidhar Mohol promoted appointed as General Secretary of Maharashtra BJP)
संघटनात्मक नियुक्तीबाबतच्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सहीनिशी काढलेल्या पत्रात म्हटलं की, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी पुढील माननीयांची नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये अॅड. माधवी नाईक (ठाणे), विक्रांत पाटील (रायगड), आमदार रणधीर सावरकर (अकोला), संजय केणेकर (संभाजीनगर), मुरलीधर मोहोळ (पुणे). या सर्वांची नियुक्ती तक्राळ लागू होत आहे.