झिम्मा-फुगडी.., नाच गं घुमा.. आणि पिंगा...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 July 2017

पुणे - नागदेवतेची पूजा करून ‘त्या’ महिला एकत्रित आल्या होत्या. ‘गाठोडे’ असो की ‘झिम्मा फुगडी’. फेर धरून सामूहिक नृत्य करत होत्या. ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’, ‘गोफ विणू बाई गोफ विणू’ यांसारखी गाणी गात होत्या. हे करतानाच भारतीय प्रथा परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचाही सल्ला तरुणींना देत म्हणत होत्या.... ‘आम्ही जपतो आपुला वारसा तुम्हीही जपा’...

श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस. स्थळ होते सदाशिव पेठेतील म. ए. सो. मुलांचे विद्यालय (भावे स्कूल). शाळेतील शिक्षिकांनी पारंपरिक खेळ आयोजिले होते. पर्यवेक्षिका भारती तांबे यांच्यासह शिक्षिकांनी वेगवेगळे खेळ खेळत नागपंचमी साजरी केली. नागदेवतेची पूजा करायला शहरात वारूळ पाहायलाही मिळत नाही. त्यामुळे मातीच्या शिवपिंडीवर आणि नागाच्या मूर्तीवर फुले वाहत आपली सेवा त्या अर्पण करीत होत्या. 

तांबे म्हणाल्या, ‘‘नागपंचमी हा सण वयाचे बंधन विसरायला लावतो. गाण्यांच्या शब्दांवर फेर धरताना मन प्रसन्न होते.’’ छाया आढारी म्हणाल्या, की फुगडी खेळताना माहेरची आठवण आली, तर सायली कोल्हे यांनी खेळ खेळताना सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. श्‍यामल तांबे म्हणाल्या, ‘‘भारतीय संस्कृतीत विशिष्ट सणांसोबतच पारंपरिक खेळांची रचना केल्याने स्त्रियांना सामूहिक खेळ खेळता येतात. त्याचे जतन व्हायला पाहिजे.’’

दगडी नागोबा मंदिरात गर्दी
गणेश पेठेतील दगडी नागोबा मंदिरात नागदेवतेच्या दर्शनासाठी महिलांनी गर्दी केली होती. तेथील परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. तर घरोघरीही पाटावर गंधाने नागकुळे काढण्यात आली. तसेच माती, पीओपीच्या नागाच्या मूर्तीचे पूजन महिलांनी केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news nag panchami