

Narayangaon Police Recover Stolen and Lost Mobiles Worth Lakhs
Sakal
नारायणगांव : नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन मागील दोन वर्षात गहाळ झालेले ९ लाख ९६ हजार रूपये किंमतीचे एकुण ३८ मोबाईलचा तपास करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत. मोबाईल परत मिळाल्यामुळे संबंधित आनंदी झाले असून त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याचे आभार मानले आहेत.