Nitin Gadkari : पुणेकर वाहतूक कोंडीत अन् गडकरींकडून चांदणी चौकाची हवाई पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

Nitin Gadkari : पुणेकर वाहतूक कोंडीत अन् गडकरींकडून चांदणी चौकाची हवाई पाहणी

पुणे - चांदणी चौकात गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिवाय वाहतूक कोडींत दोन रुग्णवाहिका देखील अडकून पडल्या होत्या. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली. मात्र हवाई पाहणीतून गडकरांनी पुणेकरांचा त्रास कसा समजणार, असा प्रश्न पुणेकर उपस्थित करत आहेत. (nitin gadkari news in Marathi)

हेही वाचा: दरवेळी चर्चा होते पण Pankaja Munde भाजप सोडणार तरी कधी ?

रविवारी मध्यरात्री दोन वाजता चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांनी पाडला जाणार आहे. या संपूर्ण कामाचा आणि पूल कसा पाडला जाणार याची माहिती गडकरी यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. गडकरी यांनी चांदणी चौकातील संपूर्ण कामाचा आढावा हवाई मार्गानेच घेतला.

हेही वाचा: Abdul Sattar on BJP : "माझ्या मतदारसंघात भाजपासोबत युती नको"

चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया सुरू असून एक लेन बंद करण्यात आली आहे. मात्र यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत काही आपत्तीजनक प्रसंग आला, अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका जायची असेल तर मार्ग कसा काढणार असा प्रश्न उपस्थित होतोय. वाहतूकीचं नियोजन करणाऱ्यांकडे देखील याबाबत स्पष्टता नाही. या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

टॅग्स :Pune NewsNitin Gadkari