महाराष्ट्र नागरी सेवा संधी आणि आव्हाने

महाराष्ट्र नागरी सेवा संधी आणि आव्हाने

पारंपरिक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणातून करिअर करण्याकडे आजच्या पिढीचा कल आहे, पालकांचीही तीच इच्छा असते. मात्र या विचारसरणीला छेद देत स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती यांकडे योग्य पर्याय म्हणून आजची पिढी पाहते. राज्यात लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन अभ्यासाची तयारी करतात, मात्र खोलवर विचार केल्यास करिअरचे पर्याय निवडताना त्यातील संधी व आव्हाने यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असेच दिसते.

या परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी पहिल्या अथवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होताना दिसतात. मात्र काही विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षे किंवा यापेक्षाही जास्त कालावधी लागतो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर येणारे दडपण, मित्र, आप्तेष्टांकडून केली जाणारी विचारणा, पुढच्या परीक्षेत नक्की यशस्वी होईल ही आशा आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा यांमध्ये विद्यार्थी गुरफटत जातो. ‘शिवनेरी फाउंडेशन’ने राज्यातील अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. यामध्ये अनेक बाबी समोर आल्या. शहरी भागात जाऊन कोचिंग क्‍लासेस लावता येत नाहीत, अभ्यासाची साधने एका जागेवर न मिळाल्याने अनेकविध साहित्य अभ्यासावे लागते, खूप जास्त अभ्यासामुळे ताणही वाढतो. घरबसल्या परीक्षेचा अभ्यास करता येऊ शकेल असे साहित्य उमेदवारांकडे नसते, हेही हे दिसून आले. त्यातून या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन देऊन अभ्यासाचा आराखडा दिल्यास प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण होणे आवाक्‍यातील गोष्ट आहे, ही बाब जाणून घेत ‘शिवनेरी फाउंडेशन’ने डिजिटल तंत्र तयार केले असून, ते राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे काम सुरू आहे.

उमेदवारांना फायदेशीर ठरणाऱ्या या तंत्राची माहिती आम्ही देणार आहोत. तत्पूर्वी कमी कालावधीत यशस्वी होणारे विद्यार्थी व माझ्यामध्ये नेमका फरक कोणता आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्‍यक आहे. कोणताही विद्यार्थी अठरा महिन्यांच्या कालावधीत सहजपणे चांगल्या प्रयत्नांनी यशस्वी होऊ शकतो, हे आमचे मत आहे. अर्थात, हे कसे शक्‍य आहे? त्यासाठी काय करावे लागेल, हे प्रश्न आपोआप समोर येतील. त्यासाठी काही मुद्दे!

पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात कसे?
कमी कालावधीत उत्तीर्ण होणारे व अनेक वर्षे अभ्यास करूनही अपयश पदरी पडणारे विद्यार्थी यांच्यात अभ्यासाची नेमकी पद्धत व स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन हा फरक आहे. कमी प्रयत्नात यशस्वी होणारे विद्यार्थी अभ्यासाच्या पद्धतीतील टप्पे समजावून घेतात, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रमाचे नेमकेपण समजून घेऊन परीक्षेविषयी सखोल व योग्य माहिती मिळवतात. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, प्रश्न नेमक्‍या कोणत्या पद्धतीने विचारले जात आहेत, मी कोणत्या पद्धतीने वाचन करायचे आहे, कोणकोणती पुस्तके वाचायची आहेत, त्यासाठीचे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे लागेल याची माहिती ते घेतात. त्यांना अवांतर वाचन, वर्तमानपत्रांचे नियमित वाचन व कात्रणे काढण्याची सवय असते. अभ्यासाची स्वतंत्र शैली म्हणून नियमितपणे गटचर्चा करतात. अभ्यासात नियमितपणा व सातत्य असते. प्रश्नपत्रिकांचे विश्‍लेषण व नेमके वाचन करून ज्या घटकांमध्ये आपण कमी पडतोय त्या घटकांची तयारी करतात. संबंधित घटकाच्या बाबतीतील अद्ययावत घटनांवर ते बारकाईने लक्ष देऊन नमूद करून घेतात.

मित्रांनो, अभ्यासक्रमाचे छोटे-छोटे टप्पे पाडणारे विद्यार्थी उदा. ः अर्थशास्त्रामध्ये सहा घटक असतील, तर आज मी या पैकी कोणत्या घटकाची तयारी करणार आहे याचे नियोजन करतात. दररोज मी काय करणार, हे ठरवून छोटे टप्पे घेतात. ते पूर्ण करतात. त्यातून अभ्यासातही सातत्य राहते व ध्येयाकडील वाटचालीचे अंतर कमी होत जाते.

यश न मिळण्यामागे अभ्यासाचे निश्‍चित नियोजन नसणे, कोणती परीक्षा द्यायची आहे याबद्दल एकमत नसणे, राज्यसेवेची परीक्षा आली, की त्याचा अभ्यास, फौजदार, विक्रीकर निरीक्षक, सहायकांच्या जाहिराती आल्या, की पुन्हा त्या पदांच्या अभ्यासाला सुरवात अशा पद्धतीने यशही एकमताने मिळत नाही. परीक्षा आली, की १२ ते १५ तास अभ्यासामुळे आपण वर्षानुवर्षे परीक्षा देत राहतो. गाइडचा जास्तीत जास्त वापर करतो. प्रत्येकवेळी मी अभ्यास केला होता, मात्र पेपर अवघड होता, मेरिट जास्त लागले, अशी कारणे योग्य नाहीत. इतर विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना मला अपयश का येते, हे प्रामाणिकपणे तपासून आपण कोठे कमी पडतो याचे ठळक मूल्यमापन करावे आणि टाळण्याची सुरवात करावी.

सीइंग इज बिलिव्हिंग!
‘शिवनेरी फाउंडेशन’ने लाखो विद्यार्थ्यांचा विचार केला आणि त्यांना घरबसल्या, स्वतःची कामे सांभाळून, अगदी कोचिंग क्‍लासेसप्रमाणे तज्ज्ञांची व्हिडिओ लेक्‍चर्स उपलब्ध करून दिली आहेत. आपल्याकडे ‘सीइंग इज बिलिव्हिंग’ अशी इंग्रजी म्हण आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याखेरीज त्याच्यावर विश्‍वास बसत नाही. अलीकडे व्हिज्युअल्स ही संकल्पना अधिक ठळकपणे समोर येत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर सर्व अभ्यासच मुळात कोणीतरी आपल्याला शिकवतो आहे, अशा दृष्टीनेच अभ्यासायचा अशी ही संकल्पना आहे. अपयशावर मात करण्यासाठी प्रेरणा द्यायची हीच ‘शिवनेरी’ची भावना आहे आणि आत्मविश्वासाने उभा राहणारा उमेदवार ही स्पर्धा परीक्षेतील नवी पिढी पाहायची आहे, म्हणूनच हा पत्रप्रपंच! 
पुढील विषयासह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूच!

डिजिटल तंत्राचे स्वरूप!
अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे तंत्र मोबाईल फोन आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन साधनांसाठी वापरता येऊ शकेल. अँड्रॉईड मोबाईल फोन असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते मिळेल. एकाच मोबाईल फोनवर त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध असेल.

तंत्राची झलक येथेही पाहता येईल...
‘यू-ट्यूब’वर शिवनेरी ॲकॅडमीचा चॅनेल आहे. शिवनेरी ॲकॅडमीवर (shivneri academy) सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌स ॲप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल. 

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क - ७३५०००१६१७ (सकाळी १० ते सायंकाळी ६ - रविवार वगळता)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com