संगीत साधना गर्भ 'आरंभी'

singer aarambhi rithe
singer aarambhi rithe
Updated on

तीन वर्षांच्या चिमुरडीचे भल्याभल्यांना थक्क करणारे गायन

पिंपरी (पुणे) : बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, असं म्हटलं जातं; पण ते आईच्या गर्भातच दिसतात, असं म्हटलं तर? अभिमन्यूला चक्रव्यूहात प्रवेश करण्याचे संस्कार गर्भातच मिळाल्याची पौराणिक कथा आपण ऐकतो. वानगीदाखल हे उदाहरण खरे असले तरी, एखादा कलावंतही आईच्या गर्भातच तयार होतो, हे जगताप डेअरी येथील आरंभी रिठे या तीनवर्षीय चिमुरडीच्या गायकीकडे पाहिल्यावर लक्षात येते. आपल्या सुमधुर स्वरांनी वेड लावणाऱ्या या चिमुरडीचे गायन कौशल्य भल्याभल्यांना थक्क करते. स्पष्ट उच्चार आणि अचूक सूर हे तिच्या गायनाचे वैशिष्ट्य.


वर्षानुवर्षे गायनाचे धडे घेऊनही ताल आणि सुराचा समन्वयही साधू न शकणारे अनेक सापडतात; पण वयाच्या अवघ्या तिसऱ्याच वर्षी आरंभीने ताल, सूर आणि लय यावर चांगलेच प्रभुत्व मिळविले आहे. संगीत आणि गायन क्षेत्रात असलेल्या आपल्या वडिलांनाही ती वाद्यावरील सुरात झालेल्या चुका समजावून सांगते. मुळात वडील तुषार रिठे यांच्याकडूनच तिला गायन आणि संगीत क्षेत्राचा वारसा आणि बाळकडू मिळाले आहे. बंदिशींपासून, अलंकार, स्वर, नाद याचीही तिला चांगली जाण आहे. गीत रामायणातील "कुशलव रामायण गाती, रामप्रभू ऐकती' हे गीत ती एखाद्या सरावलेल्या गायिकेप्रमाणे गाते. "कट्यार काळजात घुसली' चित्रपटातील "सूर निरागस हो' या कठीण गाण्यापासून "नंदकिशोरा, चित्त चकोरा', "जमेल तेव्हा जमेल त्याने' अशी अनेक गाणी तिची तोंडपाठ आहेत. "लग जा गले', "कोई हमदम ना रहा' या हिंदी चित्रपटगीतेही ती अचूक गाते. "वादळवाट' या मालिकेपासून सध्याच्या मालिकांपर्यंतची शीर्षकगीतेही तिची आवडीची. त्या व्यतिरिक्तही पियानो आणि हार्मोनिअम वादनातही तिची हातोटी असून, वडिलांनी हार्मोनिअमवर वाजविलेल्या सुरांचे बोल ती पटकन ओळखते.

केवळ बडबड गिते गाण्याच्या या इवल्याशा वयात आरंभीने दिवाळी पहाटमध्ये नुकतेच गायन केले. त्याला रसिकप्रेक्षकांनी अक्षरश: डोक्‍यावर घेतले. संगीत क्षेत्राकडे प्रचंड ओढा असल्याने ती गायनाचा रियाज एक दिवसही चुकवत नाही. आरंभीवर गायनाचे संस्कार करण्यात तिचे वडील तुषार यांचा मोलाचा वाटा आहे. मोरवाडी येथील एका खासगी शाळेत संगीत शिक्षक असलेल्या तुषार यांचा शास्त्रीय संगीत, गायनात हातखंडा आहे. तबला, सिंथेसायझर, हार्मोनिअम याचे खासगी क्‍लासही ते चालवितात. शाळेच्या दोन ते तीन म्युझिक सीडींचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. गाण्यांचे कार्यक्रम करण्याबरोबर, अनेक ठिकाणी त्यांनी वाद्यांवर साथसंगतही केली आहे. अशा चतुरस्र वडिलांकडूनच आरंभीला गायनाचे धडे मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com