'पीएमआरडीए'चे अधिसूचित क्षेत्र घोषित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकारक्षेत्रातील गावांची सुधारित हद्द निश्‍चित करून त्याला "अधिसूचित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तसेच पीएमआरडीएला "विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून मंजुरी दिल्याची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे.

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकारक्षेत्रातील गावांची सुधारित हद्द निश्‍चित करून त्याला "अधिसूचित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तसेच पीएमआरडीएला "विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून मंजुरी दिल्याची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे.

नगर विकास प्राधिकरणाकडून "महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम-1966' नुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण गठित केले. त्यानंतर अधिकारक्षेत्रातील हद्द वाढवून सुधारित हद्दवाढ चार डिसेंबर 2015 मध्ये घोषित केली. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका; पुणे, खडकी, देहू कॅंटोन्मेंट क्षेत्र आणि जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्था वगळता उर्वरित सात तालुक्‍यांच्या क्षेत्राचा समावेश केलेला आहे. स्थानिक प्राधिकरण व विशेष नियोजनाचे क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्र "अधिसूचित' घोषित केल्याची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचित क्षेत्रासाठी पूर्वलक्षी प्रभावाने 31 मार्च 2015 पासून "पीएमआरडीए'ला नियुक्त केल्याचेही स्पष्ट केले आहे.

लवासासाठी ज्या पद्धतीने "पीएमआरडीए'ला अधिसूचनेद्वारे "विशेष नियोजन प्राधिकरण'चा दर्जा दिला गेला. त्याप्रमाणे पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रातील संपूर्ण क्षेत्रासाठी "विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून नियुक्ती केली आहे. ही वैधानिकदृष्ट्या अत्यावश्‍यक बाब होती. यामुळे "पीएमआरडीए'ला विविध प्रकल्प, नगररचना, परियोजना आणि नियोजन करण्याचे सर्वाधिकार प्राप्त झाले असून, प्रशासकीयदृष्ट्या आता सुलभता आणि गतिमानता येईल. पीएमआरडीएची अंतिम हद्दनिश्‍चितीही अधिसूचनेद्वारे घोषित केली आहे.
- किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

चतुःसीमा दर्शविणारी अनुसूची
1) पूर्व - शिरूर तालुक्‍यातील तरडोबाचीवाडी, गोळेगाव, चव्हाणवाडी, निमोणे, न्हावरा, खोकडवाडी, आंदळगाव, नागरगाव गावाची पूर्व हद्द ते दौंड तालुक्‍यातील गणेश रस्ता, नाणगाव, वरवंड गावाच्या पूर्व हद्दीपर्यंत.

2) दक्षिण - दौंड तालुक्‍यातील बोरी पारधी, वाखरी, भांडगाव, यवत, भरतगाव, ताम्हणवाडी, डाळिंब या गावाची दक्षिण हद्द, हवेली तालुक्‍यातील शिंदवणे गावाची दक्षिण हद्द, पुरंदर तालुक्‍यातील गुऱ्होळीची पूर्व हद्द, सिंगापूर गावाची पूर्व व दक्षिण हद्द, उदाचीवाडी, कुंभारवळण गावाची दक्षिण हद्द ते पिंपळ गावची पूर्व हद्द, बोऱ्हलेवाडी गावाची पूर्व हद्द, पाणवडी गावाची पूर्व व दक्षिण हद्द, घेरा पुरंदर, भैरववाडी, मिसाळवाडी गावाची दक्षिण हद्द, कुंभोशी या गावांची पूर्व व दक्षिण हद्द, भोर तालुक्‍यातील मोरवाडी, वाघजवाडी, भोंगवली, पांजळवाडी, टपरेवाडी, गुणंद गावाची पूर्व हद्द, वाठारहिंगे, न्हावी, राजापूर, पांडे, सारोळे, केंजळ, धांगवडी, निगडे, कापूरव्होळ, हरिश्‍चंद्री, उंबरे, सांगवी खुर्द, निधान, दिडघर, विरवडे, जांभळी, सांगवी बुद्रुक या गावांची दक्षिण हद्द. वेल्हे तालुक्‍यातील आंबवणे, करंजावणे, अडवली, मार्गासणी, आस्कावाडी, विंजर, मळवली, लासीरगाव, दापोडे या गावांची दक्षिण हद्द, वेल्हे तालुक्‍यातील दापोडे गावची पश्‍चिम हद्द, खामगावची दक्षिण हद्द ते रुळे, कडवे, वडघर, आंबेगाव बुद्रुक, दिवशी, शिरकोळी, थानगाव, पोळे, माणगाव या गावांची दक्षिण हद्द. माणगाव आणि कशेडी या गावांची पश्‍चिम हद्द, मुळशी तालुक्‍यातील ताव व गडले गावची दक्षिण हद्द.

3) पश्‍चिम - मुळशी तालुक्‍यातील धामणओहोळ, ताम्हिणी बुद्रुक, निवे, पिंपरी, घुटके, एकोले, तैलबैला, सालतर, माजगाव, आंबवणे, पेठ शहापूर, देवघर या गावांची पश्‍चिम हद्द. मावळ तालुक्‍यातील आटवण, डोंगरगाव, कुणेनामा, उधेवाडी, जांभवली, कुसूर, खांड, सावले या गावांची पश्‍चिम हद्द.

4) उत्तर - मावळ तालुक्‍यातील माळेगाव बुद्रुक, पिंपरी, माळेगाव खुर्द, कुणे अनसुटे, इंगळून, किवळे, कशाळ, तलाट या गावांची उत्तर हद्द. खेड तालुक्‍यातील वाहगाव, तोरणे बुद्रुक, हेतरूज, कोहिंदे बुद्रुक, गारगोटे, कडुस या गावांची उत्तर हद्द, चास गावची पश्‍चिम हद्द ते कमान, मिरजेवाडी या गावांची उत्तर हद्द, काळेचीवाडी, अरुदेवाडी, सांडभोरवाडी, गुळाणी, चिंचबायवाडी, जऊळके बुद्रुक, वाफेगाव, गडकवाडी या गावांची उत्तर हद्द, शिरूर तालुक्‍यातील थापेवाडी, माळवाडी, खैरेनागद, कान्हूर मेसाई, मिडगुळवाडी, मलठण, आमडाबाद, आण्णापूर, शिरूर या गावांची उत्तर हद्द.

Web Title: pune news pmrda area declare