esakal | Pune: महार वतन जमिनी संदर्भात धरणे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : महार वतन जमिनी संदर्भात धरणे आंदोलन

पुणे : महार वतन जमिनी संदर्भात धरणे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंढवा : खराडी येथील सर्वे नंबर ७६ मधील महार वतन जमिनी संदर्भात, जिल्हाधिकारी यांचे स्तरावर संबंधित अधिकारी वर्गाची बैठक आयोजित व्हावी, या मागणीसाठी गेल्या अठरा दिवसापासून मांजराई नागरिक कृती समितीने आंदोलन सुरू आहे.

अजूनही त्यांच्या मागण्याना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे त्यांचे बेमुदत धरणे आंदोलन अजूनही सुरू राहणार असल्याचे समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवी यांनी सांगितले. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर, माजी महापौर व नगरसेवक बंडू गायकवाड, वाघोलीचे माजी सरपंच सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव मोहन जगताप व सचिव प्रदीप साठे यांनी आंदोलन स्थळी जावून आंदोलन कर्त्यांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व जिल्हाधिकारी यांची शिष्टमंडळास आपण भेट घेऊ असे आश्वासन दिले.

loading image
go to top