Pune News : देवदर्शनासाठी चाललाय? आज 'या' वेळेत मंदिरं राहणार बंद; जाणून घ्या...

तीन तास पुण्यातली प्रमुख मंदिरं बंद राहणार आहेत.
Dagdusheth Ganpati
Dagdusheth GanpatiSakal

आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात अंशतः दिसणार आहे. याच निमित्ताने आज अनेक शहरांमधली अनेक मंदिरं बंद राहणार आहेत. पुण्यातली मुख्य मंदिरंही आज बंद असतील.

सलग तीन तास पुण्यातली मंदिरं बंद राहणार आहे. दगडूशेठ गणपती मंदिरासह काही प्रमुख मंदिरं दुपारी ४ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. सूर्यग्रहण असल्याने ही मंदिरं बंद करण्यात आली आहे. ग्रहण संपल्यावर अभिषेक करून ही मंदिरं भाविकांसाठी खुली केली जाणार आहेत.

आजचं सूर्यग्रहण ४ तास ३ मिनिटांचं असणार आहे. दुपारी अडीच वाजल्यापासून हे ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी साडेसहा वाजता संपेल. भारतात संध्याकाळी ४ वाजून २२ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार आहे. तब्बल २७ वर्षांनंतर दिवाळी सणाच्या काळामध्ये ग्रहणाचा योग आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com