संगीत नाटकातून उलगडणार पलुस्करांचा जीवनपट

स्वप्नील जोगी 
सोमवार, 26 जून 2017

पुणे - स्वातंत्र्यपूर्व भारतात शास्त्रीय संगीतामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आणि ‘गांधर्व महाविद्यालय’च्या रूपात लाहोर येथे तत्कालीन भारतातली पहिली राजाश्रयरहित संगीत-शिक्षण संस्था उभी करणारे महान गायक-संगीततज्ज्ञ पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या जीवनावर लवकरच एक तीन अंकी संगीत नाटक येऊ घातलंय. विशेष म्हणजे, शास्त्रीय संगीत क्षेत्रातला हा दुर्मिळ योग पहिल्यांदाच जुळून येतोय तो थेट सातासमुद्रापार अमेरिकेतून!

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारं आणि घराण्यांच्या संगमरवरी चौकटीबाहेर काढत सर्वसामान्यांपर्यंत पोचवणारं व्यक्तिमत्त्व म्हणून पलुस्कर ओळखले जातात. या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला त्याचे विविध पैलू उलगडत जगापुढे आणण्यासाठी शशिकांत पानट यांनी हे संगीत नाटक आणण्याचं ठरवलंय. गेल्या चार दशकांहून अधिक काळ अमेरिकेत वास्तव्यास असणारे पानट सातत्याने व्रतस्थपणे या महत्त्वाकांक्षी नाटकावर काम करत आहेत.

‘सकाळ’शी बोलताना पानट म्हणाले, ‘‘माझे मित्र संगीत दिग्दर्शक डॉ. प्रदीप साठे यांच्या आग्रहावरून मी पलुस्करांचा अभ्यास करायला घेतला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की संगीतात एवढं महत्त्वाचं कार्य करूनही पलुस्करांच्या जीवनावर फारसं काही लिहिलं गेलेलं नाही. त्या अर्थाने पलुस्कर दुर्लक्षितच राहिल्याचं मला जाणवलं. त्यामुळे मी अधिक जोमाने त्यांच्यावर लिहायला घेतलं.’’

पलुस्कर यांचा काळ हा १८७२ ते १९३१ चा. तो काळ, त्या वेळचे संदर्भ जसेच्या तसे उभे राहावेत यासाठी मी पाच-सहा वर्षं अभ्यास केला. त्यांच्या आयुष्यातल्या काही घटनांवर मी हे संगीतनाट्य गीतांसह लिहून काढलं. साठे यांनी त्याचं संगीत दिलंय. वॉशिंग्टनमध्ये त्याचा पहिला प्रयोग होणार आहे. त्यानंतर हे नाटक भारतातही होईल.

Web Title: pune news vishnu paluskar music

टॅग्स