नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील राहू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण विभागातील ‘यिन’च्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा निर्धार
पुणे - ‘‘तरुणांमधील नेतृत्वगुणांचा वाव देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या माध्यमातून प्रयत्नशील राहू,’’ असा निर्धार ‘यिन’च्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण या विभागातील नवनिर्वाचित शहराध्यक्षांनी केला. निमित्त होते तीन विभागांतील शहराध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाचे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण विभागातील ‘यिन’च्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा निर्धार
पुणे - ‘‘तरुणांमधील नेतृत्वगुणांचा वाव देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या माध्यमातून प्रयत्नशील राहू,’’ असा निर्धार ‘यिन’च्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण या विभागातील नवनिर्वाचित शहराध्यक्षांनी केला. निमित्त होते तीन विभागांतील शहराध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाचे.

‘यिन’मार्फत राज्यात राबविण्यात येणाऱ्या लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)च्या पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण या विभागातून प्रत्येकी दोन शहराध्यक्षांची निवड गुरुवारी करण्यात आली. शहराचे प्रतिनिधित्व करणारे हे प्रमुख आगामी काळात यिनच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणार आहेत. ‘यिन’चे शहराध्यक्ष म्हणून निवडलेल्या प्रतिनिधींचा सत्कार ‘सकाळ माध्यम समूहा’चे कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड व्ही. के. मेनन, सकाळ सोशल फाउंडेशनचे सीईओ पुनीत बाली, ‘यिन’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ‘यिन’चे माजी मुख्यमंत्री अनिकेत मोरे उपस्थित होते. या निवडीच्या कार्यक्रमाचे परीक्षण प्रा. राहुल पडळकर, मारुती शेलार, गणेश धुमाळ, अतुल मोकल आणि डॉ. राम गुडगिळा यांनी केले. यिनचे सभासदत्व असणाऱ्या प्रतिनिधींमधून ही निवड करण्यात आली. ‘यिन’साठी अधिकाधिक सभासद करणे, लेखी परीक्षा, कोणत्याही विषयावर व्यासपीठावर जाऊन बोलता येणे, व्यक्तिगत मुलाखत अशा टप्प्यांमधून ही निवड करण्यात आली आहे. 

नवनिर्वाचित शहराध्यक्ष आणि उपाध्यक्ष 
पुणे विभाग - अध्यक्ष - नीरज जाधव, सुशांत एडके, उपाध्यक्ष - नम्रता जहागीर, रविराज मासाळ

पिंपरी-चिंचवड - अध्यक्ष - राजदीप तापकीर, आकाश टेकवडे, उपाध्यक्ष - भावना बिरारी, अक्षय बर्गे

पुणे ग्रामीण - अध्यक्ष - सुजित मासाळ, नेहा काटे, उपाध्यक्ष - हृषीकेश काशीद, यासिर शेख

नीरज जाधव - ‘‘शहराध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा आनंद वाटत आहे. माझ्या परीने चांगले काम करण्याचा प्रयत्न करीन. अधिकाधिक तरुणांना ‘यिन’शी जोडण्यासाठी विशेष मेहनत घेईन.’’

सुशांत एडके  ‘‘यिनच्या माध्यमातून तरुणांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या व्यासपीठाचा वापर करून तरुणांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.’’ 

आकाश टेकवडे - ‘‘यिनद्वारे तरुणांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याशिवाय ‘यिन’चा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करीन.’’
राजदीप तापकीर ः ‘‘तरुणांनी ‘यिन’च्या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जाईल. त्यासाठी पुढाकार घेणार आहे.’’

नेहा काटे - ‘‘यिनची शहराध्यक्ष म्हणून चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करीन. त्याचबरोबर यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क वाढविण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतील.’’

सुजित मासाळ - ‘‘या व्यासपीठांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवून अधिकाधिक तरुणांना यात सहभागी करून घेणार आहे. तरुणांच्या हक्कांसाठी प्रयत्नशील राहीन.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news yin new mayor determination