Pune News : पिस्तूल हाताळताना झालेल्या गोळीबारात तरुण जखमी

खडकवासला परिसरातील घटना, पिस्तूल हाताळणाऱ्याला अटक
pistol
pistol sakal

पुणे - बेकायदेशीरपणे खरेदी केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून गोळी सुटून ती मित्राच्या मानेला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. खडकवासला परिसरातील सांगरूण गावात गुरुवारी (ता. ७) ही घटना घडली. बेकायदा पिस्तूल हाताळणाऱ्यास उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे.

अभय छगन वाईकर (वय २२) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अविष्कार ऊर्फ मोन्या तुकाराम धनवडे (वय १९, रा. सांगरूण, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अंमलदार आनंद घोलप यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धनवडे याला अटक करण्यात आली आहे.

pistol
Pune News : महावितरणच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्याला फटका; तुटलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागून गाय मृत्यूमुखी

वाईकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय वाईकर आणि अविष्कार धनवडे मित्र आहेत. दोघे खडकवासला परिसरातील सांगरूण गावात राहायला आहेत. वाईकरने बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले आहे.

ते पिस्तूल वार्इकर हा धनवडे याला दाखवीत होता. पिस्तूल हाताळताना धनवडे याच्याकडून पिस्तुलाचा चाप ओढला गेला. त्यामुळे पिस्तुलातून गोळी सुटली व ती वाईकरच्या मानेला चाटून गेली. त्यामुळे वाईकर गंभीर जखमी झाला.

pistol
Pune News : बारामतीकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार...

त्याला तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाईकरने बिहारमधून बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले आहे. त्याने पिस्तूल कशासाठी व नेमके कोणाकडून खरेदी केली केले होते, याचा तपास पोलिस करत आहेत.

pistol
Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणी कपातीचं टेन्शन होणार दूर; जाणून घ्या काय आहे तलावांची स्थिती?

पिस्तूल हाताळताना चाप ओढला गेल्याने ही दुर्घटना घडल्याचे उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक शुभांगी पवार या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com