Pune News : तरुणीच्या विनयभंग प्रकरणावर झोमॅटोचं स्पष्टीकरण; काय म्हटलंय जाणून घ्या?

फूड डिलिव्हरी बॉयन तरुणीच्या गालावर चुंबन घेत तिचा विनयभंग केला होता.
zomato
zomato

मुंबई : पुण्यातील येवलेवाडी इथं कथीत झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेवर झोमॅटोकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. डिलिव्हरी बॉय हा झोमॅटोचा कर्मचारी नव्हता असं कंपनीनं म्हटलं आहे. तसेच प्रकरणी तपास कार्यात आम्ही सहकार्य करत आहोत, असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे. (Pune News Zomato explanation on girl molestation case)

झोमॅटोनं सविस्तर स्पष्ट केली भूमिका

झोमॅटोनं म्हटलं की, "आरोपी हा झोमॅटोचा डिलिव्हरी पार्टनर नव्हता. आम्ही या प्रकरणाच्या तापसासाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आमच्या डिलिव्हरी बॉयच्या ताफ्यात सामिल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आम्ही त्रयस्त कंपनीकडून व्हेरिफिकेशन करतो. आमच्याकडे याबाबत शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्यात आलं आहे"

पुण्यात नक्की काय घडलं होतं?

पोलिसांच्या माहितीनुसार, रईस शेख (वय ४०) असं आरोपी फूड डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. त्यानं येवलेवाडीतील एका सोसायटीत शनिवारी रात्री एका १९ वर्षांची तरुणीच्या घरी फूड पार्सल डिलिव्हर केल्यानंतर तिच्या गालावर जबरदस्तीनं चुंबन घेत तिचा विनयभंग केला होता. ही तरुणी एका कॉलेजमध्ये शिकते तसेच ती आपल्या दोन मैत्रिणींसोबत राहते. शनिवारी रात्री घरी परतल्यानंतर तीनं झोमॅटोवरुन जेवण मागवलं. हे जेवणाचं पार्सल घेऊन रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास सोसायटीत दाखल झाला. जेवणाचं पार्सल तरुणीकडं देत त्यानं तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. पाणी प्यायल्यानंतर थँक्यू म्हणण्याच्या बहाण्यानं त्यानं तिचा हात पकडत आपल्याकडं ओढलं आणि तिच्या गालावर दोन वेळा चुंबन घेतलं.

पोलिसांनी केली अटक

अचानक घडलेल्या या प्रकारामुळं तरुणी घाबरली आणि तिनं थेट पोलीस स्टेशन गाठलं. तसेच या प्रकरणी तीनं पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि काही वेळातच त्याला अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर आरोपीची सध्या जामीनावर सुटकाही झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com