
पुणे : माझी मुलगी अगदीच लहान असून, तिला मोठी होताना पाहायची आहे. यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही मदत केली तर मी नक्कीच एका आजारामधून बाहेर येऊ शकेल, अशी भावना एका पित्याने व्यक्त केली आहे.
निखिल क्षीरसागर असे पित्याचे नाव आहे. कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना अचानक त्यांच्या पाठीस त्रास होऊ लागला. त्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी एमआरआय चाचणी केली. अहवाल हाती आल्यानंतर त्यांच्या पाठीला कॅन्सरचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला. फेब्रुवारी 2018 पासून उपचार सुरू आहेत. शिवाय, वेळोवेळी किमीओथेरपी करण्यात आली. परंतु, निखील हेच रुग्णालायत उपचार घेत असल्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. शिवाय, कुटुंबाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. 35 ते 40 लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु, उपचारासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता आहे.
निखील यांच्या कुटुंबियांपुढे उपचारासाठी पुढील खर्च कसा उभा करायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. दानशूर व्यक्तीनी पुढे येऊन मदतीचा हात पुढे केल्यास निखील हे लवकर आजारातून बाहेर पडतील. शिवाय, एका पित्याला आपल्या मुलीला मोठे होताना पाहता येईल. आपली मदत पुढील बॅंकेच्या खात्यावर जमा करू शकता.
आर्थिक मदतीसाठीः
निखिल क्षीरसागर
खाते क्रमांक : 700701707093644
आयएफएससी कोड : YESB0CMSNOC
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.