nira devghar dam
nira devghar damsakal

पुणे : नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले

धरणातून २ हजार २३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

भोर : तालुक्यातील नीरा देवघर धरण (nira devghar dam) गुरुवारी (ता. ५) रात्री शंभर टक्के भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शुक्रवारी (ता.६) दुपारी बारा वाजता धरणाच्या पाच दरवाजांपैकी तीन दरवाजा मधून १ हजार ४८२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला. याशिवाय २३ जुलैपासून धरणावरील वीज निर्मिती केंद्रातून ७५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे. (pune nira devghar dam 100 percent full)

गुरुवारी रात्री धरणात १०० टक्के म्हणजे ११.९१ टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरणाच्या दरवाजामधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता जलसंपदा विभागाच्या पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बारा वाजता धरणाच्या तीन दरवाजामधून पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू करण्यात आला.

nira devghar dam
गुडघा दुखावला तरी मारली बाजी, संग्राम दुसऱ्यांदा ‘आयर्नमॅन’

यावेळी नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, विभागीय अभियंता अशोक चव्हाण, परमानंद गोसावी, नाना कांबळे, मारुती कापरे, सर्जेराव लोखंडे आदींसह जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. गतवर्षी २४ ऑगष्टला नीरा-देवघर धरण भरले होते. यावर्षी १८ दिवस अगोदरच धरण भरले.

धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून दररोज ६ मेगाव्हॅट वीजनिर्मिती केली जात आहे. पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील दुस-या भाटघर धरणात ८६ टक्के पाणीसाठी झाला आहे. तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळ धरणात येणा-या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com